मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक यांचे आवाहन
गडहिंग्लज :
मुरगूड येथे दि. १५ मे २०२२ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या ऐतिहासिक लोकार्पण सोहळयाचे आपण सर्वजण साक्षीदार व्हावे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा लोकार्पण सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य दिग्गज मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या ऐतिहासिक सोहळयाचे आपण सर्वजण साक्षीदार व्हावेत यासाठी खास आमंत्रण देण्यासाठी तसेच मंडलिक युवा प्रतिष्ठानने तयार केलेल्या ट्रेलरच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत श्री प्रमोद कुराडे यांनी केले. शिवराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते.
शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे यांनी प्रास्ताविक करून छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती सांगितली. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते संधान सोनाळकर यांनी 'शस्त्र आणि शास्त्र' या विषयावर मार्गदर्शन करताना शस्त्र हे शांतीची प्रतीक आहे. यावेळी त्यांनी शिवकालीन शस्त्रे कशी होती आणि त्यांचे कार्य कसे होते याची उदाहरणासह माहिती दिली. प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श कार्याचा प्रभाव व्हिएतनाम सारख्या छोट्या देशावर कसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श युद्धनीतीच्य प्रभावाने बलाढ्य अमेरिकेला कसे हरवले याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. सौ. बिनादेवी कुराडे, सौ. रेखा पोतदार, श्री बसवराज आजरी, डॉ. सुधीर मुंज, पर्यवेक्षक प्रा.टी. व्ही. चौगुले, हर्षवर्धन चौगुले, सुमित चौगुले, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. आनंद कुंभार यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रा. तानाजी भांदूगरे यांनी मानले.
जाहिरात व बातमीसाठी संपर्क : गडहिंग्लज बुलेटिन न्यूज (GB News), गडहिंग्लज, कोल्हापूर
मोबाईल क्रमांक : 9844727598

