शिवराज विद्या संकुल व अरुण नरके फौंडेशन यांच्यात सामंजस्य करार
गडहिंग्लज :
शिवराज विद्या संकुल व अरुण नरके फौंडेशन यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. प्रारंभी जनसंपर्क अधिकारी प्रा. विक्रम शिंदे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी शिवराज विद्या संकुल व अरुण नरके फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी सेवकांची सहकारी पतसंस्थेमध्ये सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन गोकुळ दूध संघाचे संचालक व अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ दूध संघाचे संचालक व अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके यांनी ग्रामीण भागातील अधिकाधिक अधिकारी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयार व्हावेत. यासाठी शिवराज विद्या संकुल व अरुण नरके फौंडेशनने सुरु केलेल्या या केंद्रामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना अगदी माफक फी मध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन डॉ. चेतन नरके यांनी केले. नरके फौंडेशनचे समन्वयक श्री रमेश कांबळे यांनी या केंद्राच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेतून करिअर घडवू इच्छिणाऱ्या हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेतून स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.
शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत, त्यांच्या प्रयत्नाला बळ मिळावे म्हणून शिवराज विद्या संकुलाने अरुण नरके फौंडेशनशी सामंजस्य करार करून या भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून यशस्वी व्हावेत यासाठी शिवराज विद्या संकुल उदात्त हेतूने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. एस एम कदम प्रा. सौ बिनादेवी कुराडे पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ सुधीर मुंज पर्यवेक्षक प्रा. टी व्ही चौगुले प्रा. विश्वजीत कुराडे यांच्यासह सर्व शिवराज विद्या संकुलातील व नरके फौंडेशनचा सर्व स्टाफ उपस्थित होता. नरके फौंडेशनचे समन्वयक श्री रमेश कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.



