महागाव (ता.गडहिंग्लज ) :
येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहातील फार्मसी, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, नर्सिंग, पॅरामेडिकल, बी.ए.एम.एस. महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अॕड. आण्णासाहेब चव्हाण हे होते.
आठ दिवस चाललेल्या या संमेलनात पारंपरिक दिन,विविध गुणदर्शन,तज्ञाचे मार्गदर्शन झाले. विविध स्पर्धात यश मिळालेल्या विद्यार्थीना प्रमाणपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रम वाहवा मिळवली. शेवटच्या दिवशी डीजे नाईट हा रिमिक्स गाण्यावर आधारित कार्यक्रमाने तर तरुणाईत उत्साह भरला. यात विविध हिंदी -मराठी रीमिक्स गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरुन जल्लोष साजरा केला. आकर्षक सेट व लाइटिंग मुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार बनली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बी.एम.हिर्डेकर,तहसिलदार दिनेश पारगे,ऋषभ अकिवाटे, र्अॕड. बाळासाहेब चव्हाण, हे उपस्थित होते.
यासाठी डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ.प्रतिभा चव्हाण, डॉ.सुरेखा चव्हाण, यासह प्राचार्य डॉ. अन्सार पटेल, डॉ. श्रीकांत हेब्बाळकर, डॉ. सुधींद्र जवळी, डॉ. मंगल मोरबाळे, डॉ.सुजाता शेवाळे, डॉ. एस.एच.सावंत, डॉ.डी.बी. केस्ती. व सर्व शिक्षकांनी नियोजन केले. आभार रजिस्टर शिरिष गणाचार्य यांनी मानले.

