Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री हाळलक्ष्मी देवीची १० मे रोजी यात्रा

गडहिंग्लज :

गडहिंग्लज शहराचे ग्रामदैवत श्री हाळलक्ष्मी देवीची १० मे रोजी यात्रा होत आहे. अशी माहिती श्री हाळलक्ष्मी देवस्थान ट्रस्ट, वडरगे रोड, गडहिंग्लज यांच्यावतीने कळविण्यात येत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे सदरची यात्रा रद्द झाली होती. यावर्षी सालाबादप्रमाणे परंपरेनुसार अक्षय तृतीयेला पहिल्या मंगळवारी म्हणजेच १० मे २०२२ रोजी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी होत आहे. या यात्रेचे नियोजन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. या यात्रेनिमित्त होणाऱ्या महाप्रसादाची जबाबदारी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी उचलली आहे. 



सोमवार दि. ९ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री यशवंत पाटील-खातेदार यांच्या वाड्यातून पालखी मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. मंगळवार दि. १० मे २०२२ रोजी सकाळी सहा वाजता श्री नील कदम या दांपत्याच्या हस्ते अभिषेक व पूजा-अर्चा होईल. त्यानंतर सेवेकरी कुंभार समाजाच्या वतीने आकर्षक पूजा बांधण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता श्री पनोरे समाजाचा मनाचा नैवेद्य व आरती झाल्यानंतर महाप्रसादास प्रारंभ होईल. दुपारी चार वाजता वडरगे गावच्या गोसावीनाथांच्या पालखीची गळाभेट होऊन दोन्ही पालख्या मंदिरात विराजमान होतील. 



या यात्रेचे नियोजन करण्यासाठी श्री हाळलक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री किरण कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री प्रकाश रोटे, सचिव श्री प्रकाश पोवार, खजिनदार श्री यशवंत कोले, सदस्य श्री युवराज बरगे, श्री महेश पाटणे, श्री विजय मोरे, संजय रोटे, प्रवीण शिंदे, अरुण शिंदे, गणेश मंडळाचे पदाधिकारी श्री सदानंद शिंदे, संदीप रोटे व श्री हाळलक्ष्मी सार्वजनिक वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, कुंभार समाजाचे श्री यशवंत कुंभार, धोंडिबा कुंभार व सर्व सेवेकरी, तसेच श्री बाळासाहेब पनोरे आदी उपस्थित होते. ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असून, भाविकांनी यात्रा समितीस योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे. 


जाहिरात व बातमीसाठी संपर्क : गडहिंग्लज बुलेटिन न्यूज (GB News), गडहिंग्लज, कोल्हापूर 

मोबाईल क्रमांक : 9844727598

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.