![]() |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना एसबीआयचे डिव्हिजनल मॅनेजर रवीकुमार जगताप. |
गडहिंग्लज : गुंतवणूक हा आपला जगण्याचा भाग आहे. जीवनात गुंतवणुकीला फार महत्व आहे. आपण केलेली गुंतवणूक भविष्यासाठी फार महत्त्वाची व गरजेची आहे असे प्रतिपादन एसबीआयचे डिव्हिजनल मॅनेजर रवीकुमार जगताप यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात गुंतवणूक व आर्थिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस.एम.कदम होते.
स्वागत व प्रास्ताविक डॉ.महेश चौगुले यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री.जगताप पुढे म्हणाले, तुमच्या-आमच्या नैतिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वेळोवेळी केलेल्या पैशाची गुंतवणूक महत्त्वाची आहे.म्हणून आजच्या बदलत्या परिस्थितीत आपल्या उत्पन्नाला संरक्षण देणे गरजेचे आहे. आपले भविष्य अधिक सुकर करण्यासाठी आर्थिक नियोजन करणे ही काळाची गरज आहे तरच आपण जीवनात अधिक सक्षमतेने पुढील वाटचाल करू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आपल्या पैशाची गुंतवणूक कशी करावी, त्या गुंतवणुकीवर मिळणारे लाभ तसेच भविष्यासाठी असणारी गरज याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास एसबीआयच्या एरिया मॅनेजर सुप्रिया कांबळे , पर्यवेक्षक प्राध्यापक टी.व्ही.चौगुले यांच्यासह सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक उपस्थित होते