हलकर्णी (तालुका चंदगड) : गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने हलकर्णी व चंदगड , आजरा तालुक्यातील तरुणांसाठी गुरुवार दिनांक १९ मे रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तरुणांना तात्काळ नेमणूक पत्र देण्यात येणार आहे. तसेच येथून गोव्यात नेण्याची सोय देखील करण्यात येणार आहे.
गोव्यातील नामांकित कंपन्यात हलकर्णी परिसरातील ग्रामीण भागातील युवक व युवतीना रोजगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधारक मुले व मुली यांनी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत साई मोटार ड्रायव्हिंग स्कूल, दौलत साखर कारखाना रोड ,बँक आॅफ बडोदा शेजारी हलकर्णी फाटा ता. चंदगड येथे उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी दोन प्रतीत बायोडाटा घेऊन येणे आवश्यक आहे. याठिकाणी कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष जाग्यावर येऊन मुलाखतीतून उमेदवारची निवड करणार आहेत.
अधिक माहितीसाठी कृष्णा सावंत 8263866234, राहुल 8888430143, राजेश 7709151121, निलेश मोरजकर 9763717790, जे डी पाटील 8605703103 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
