तेरणीत उद्या 'शासन आपल्या दारी'
May 17, 2022
0
गडहिंग्लज : तेरणी येथे महसूल लोकजत्रा योजनेअंतर्गत हलकर्णी, तेरणी, कळवीकट्टी, बुगडीकट्टी, तूपुरवाडी गावासाठी बुधवार दिनांक 18 मे रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मराठी विद्या मंदिर तेरणी येथे 'शासन आपल्या दारी' अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानाचे उदघाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे ,निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील ,महसूल नायब तहसीलदार राजेंद्र यादव, निवडणूक नायब तहसीलदार विष्णू बुट्टे,तेरणीचे सरपंच मोसिम मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी तहसील कार्यालय, पंचायत समिती आरोग्य विभाग, सामाजिक वनीकरण ,एकात्मिक बाल विकास विभाग, भुमी अभिलेख विभाग, पशुवैद्यकीय विभाग, राज्य परिवहन मंडळ विभाग, पंचायत समिती, पोस्ट ऑफिस, पाटबंधारे विभाग, ग्रामपंचायत विभाग ,कृषी विभाग, राज्य वीज वितरण कंपनी विभाग, दुय्यम निबंधक सहकारी संस्था विभाग, वन विभाग आदी विभागातील ग्रामस्थांची कामे एकाच छताखाली करून देणार आहेत. या अभियानाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन तेरणीचे सरपंच प्राध्यापक मोसिम मुल्ला, बुगडीकट्टीचे सरपंच दयानंद देसाई, हलकर्णीच्या सरपंच सौ. योगिता संगाज,कळविकट्टेच्या सरपंच सौ.संगीता कांबळे , तूपूरवाडीच्या सरपंच सौ.स्मिता पाटील यांनी केले आहे.

