Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री हाळलक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात


गडहिंग्लज :
गडहिंग्लज शहराचे ग्रामदैवत हाळलक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त हाळलक्ष्मी देवस्थान ट्रस्ट  यांच्यावतीने आयोजित महाप्रसाद वाटप शुभारंभ शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲडवोकेट दिग्विजय कुराडे दाम्पत्य व संग्रामसिंह कदम दांपत्य यांच्या हस्ते करण्यात आला .पहाटे कौस्तुभ कदम या दांपत्याच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली . त्यानंतर महाप्रसादास प्रारंभ झाला.दुपारी चार वाजता वडरगेच्या गोसावीनाथांच्या पालखीची गळाभेट घेऊन दोन्ही पालख्या मंदिरात विराजमान झाल्या.या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ उर्मिला जोशी, वंदना साबळे , ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रकाश रोटे, सचिव प्रकाश पोवार,सदस्य युवराज बरगे,महेश पाटणे ,विजय मोरे , संजय  रोटे, प्रवीण शिंदे ,अरुण शिंदे ,गणेश मंडळाचे पदाधिकारी सदानंद शिंदे ,संदीप रोटे, सदाशिव रोटे, विशाल रोटे, युवराज आडावकर व  हाळलक्ष्मी सार्वजनिक वाचनालयाचे सर्व पदाधिकारी , कुंभार समाजाचे यशवंत कुंभार, धोंडीबा कुंभार , सुनील कुंभार व सर्व सेवेकरी तसेच बाळासाहेब पनोरे उपस्थित होते .सल्लागार भारत कोळेकर,श्री,खापरे ,अशोक रोटे, राजेंद्र खोराटे , श्री लोंढे यांचे सहकार्य लाभले . यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व भाविकांनी यात्रा समितीला सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.