गडहिंग्लज : शिक्षणामुळे करिअर करण्याची मोठी संधी प्राप्त होत आहे .सध्याच्या जीवनात सर्वात जास्त ज्ञान व माहिती असणारी व्यक्ती ही आपल्या करिअरला गवसणी घालू शकतो .करिअर मधून घडण्यासाठी सध्या खूप संधी उपलब्ध आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा त्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली पाहिजे असे प्रतिपादन जागतिक अर्थतज्ञ डॉक्टर परशराम पाटील यांनी केले .येथील शिवराज महाविद्यालय व अन अकॅडमी बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर मेळाव्यात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस .एम .कदम होते. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आला. स्वागत व प्रस्ताविक डॉक्टर सुधीर मुंज यांनी केले .पाहुण्यांचा परिचय डॉक्टर महेश चौगुले यांनी करून दिला . यावेळी मार्गदर्शन करताना अर्थतज्ञ डॉक्टर पाटील पुढे म्हणाले , शिक्षणाला कौशल्यपूर्ण ज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण करीत असताना इतर काही कौशल्य ज्ञान विकसित करता येते याची सांगड घालून करिअर घडविले पाहिजे . विद्यार्थ्यांनी भविष्यात काय करायचे आहे ते आत्ताच ठरवले पाहिजे . पूर्वी करिअर घडविण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागत असे आता डिजीटल युगात सर्वत्र उपलब्ध आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले . अकॅडमीचे आदित्य शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनात जीवनात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी, मेहनतीचे फळ मिळतेच. आज जमाना बदलत आहे . सामान्य कुटुंबातील देखील उच्च पदावर कार्यरत आहेत . समाजासाठी काहीतरी करण्याची आपली जबाबदारी वाढलेली आहे. आज देशाला मोठ्या प्रमाणात सीएची गरज असल्याचे सांगून त्यांनी सीएमध्ये करिअर करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले . अन अकॅडमी बाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. समाजासाठी खूप काही करण्याची जबाबदारी आपल्यावर आले आहे आपण सर्वांनी आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी देखील आपला प्रयत्न महत्त्वाचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. संस्था सचिव डॉक्टर अनिल कुराडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी प्राप्त व्हावेत तसेच बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना कर्तुत्व सिद्ध करण्याच्या खूप संधी आहेत त्याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉक्टर एस .एम. कदम यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच नवा बदल स्वीकारून करियर केले पाहिजे त्याचबरोबर आपला दृष्टिकोनही बदलला पाहिजे त्यासाठी बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्याची व सातत्याने अभ्यास व कष्ट करण्याची तयारी ठेवावी तरच आपले करिअर घडवणे शक्य असल्याचे सांगितले . या महामेळाव्याला संस्थेचे उपाध्यक्ष ॲडवोकेट दिग्विजय कुराडे , प्राध्यापक सौ. बिनादेवी कुराडे , अकॅडमीचे मोहित शर्मा , पर्यवेक्षक प्राध्यापक चौगुले , विकास अधिकारी सूर्यकांत नाईक, ऑफिसर शिवाजी कोळी, को-ऑर्डिनेटर प्राध्यापक किशोर अदाटे , विभाग प्रमुख प्राध्यापक के .एस .देसाई , शिवराज इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका सौ. गौरी शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर , प्राध्यापक , प्रशासकीय सेवक व चंदगड , आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आनंदा कुंभार, प्राध्यापक ए.के.मोरमारे, प्रा.नाझीया बोजगर यांनी केले.
![]() |
| गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित करिअर महामेळाव्यास उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी. |


