गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील साधना प्रशालेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात आला. प्राचार्य आय. पी. कुटिन्हो व पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. दहावी मधील विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक बनून अध्यापनाचा अनुभव घेतला. शिक्षकांसाठी मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले.
याप्रसंगी सुशिलकुमार पाटील, अनुराग कांबळे, सिद्धी कुराडे, आरुष कापसे, श्रीहान जोशी, शिफा मकानदार, एन. डी. शेख, पी. के. हरेर, बी. एन. वाघमारे, ए. जे. बारदेस्कर, आय. पी. कुटिन्हो यांनी आपल्या मनोगतातून गुरुंचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का शिवणे, आराधना कोळी यांनी केले. आभार आदर्शिनी लोहार यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील सहाय्यक शिक्षक जे. के. सोज व डी. एस. अडसुळे यांनी केले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


