
गडहिंग्लज : तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या हस्ते सातबारा उतारा स्वीकारताना वसंत नाईक व मिनाक्षी नाईक.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाला गडहिंग्लज तहसील कार्यालयात बुधवारी सुरुवात झाली.
लक्ष्मी मुक्ती योजनेतील लाभार्थ्याला सातबारा, जातीचे दाखले व उत्पन्न दाखले प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. भडगाव येथील शेतकरी खातेदार वसंत नाईक यांनी आपल्या ७/१२,८अ उतारावर पत्नीचा सहहिसेदार म्हणून नाव लावून घेतले आहे. सेवा पंधरवडा उपक्रमा निमित्त लक्ष्मी मुक्ती योजनाचे लाभार्थ्यीना सातबारा नोंदीचे पत्रक वाटप करण्यात आले.


