Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुत्नाळच्या श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलचे पोस्टर सादरीकरण स्पर्धेत यश



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुत्नाळ येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलच्या कु.नीता अशोक धुळाज व स्मिता नंदकुमार पाटील या विद्यार्थिनींनी डॉ.ए.डी.शिंदे इंजीनियरिंग कॉलेज भडगाव येथे झालेल्या पोस्टर सादरीकरण स्पर्धेत 9 वी ते 10 वी गटात द्वितीय क्रमांक मिळवला. अभियंता दिनानिमित्त ॲड. श्रीपतराव शिंदे शिक्षण समूह,भडगाव यांच्यावतीने पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित केली होती.




विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा -जीवन वाचवा या विषयावर पोस्टर तयार केले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख 1250 रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. मुख्याध्यापक शिवाजी अनावरे व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक दत्ता लोहार, वैशाली कागवाडे,विजयकुमार शेडगे, शेखर गवळी  या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.