गडहिंग्लजला पी.सी.पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
संस्थेला 97 लाख रुपये नफा ; लेखापरीक्षणात "अ" वर्ग
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संस्थेच्या उत्कृषासोबत सभासदांसाठी कल्याणकारी योजना राबविणार असल्याची घोषणा पी.सी.पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभापती उत्तम यमगेकर यांनी केली.
पी.सी.पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
सहकार, बचत, स्वावलंबन, सचोटी, काटकसर व प्रगती हे ब्रीद जपत संस्थेने यावर्षी जवळजवळ 97 लाख रुपये इतका विक्रमी नफा मिळवला असून लेखापरीक्षणात "अ" वर्ग मिळवला असल्याची माहिती सभापती श्री. यमगेकर यांनी दिली. सभेत 15 टक्के डिव्हिडंट देण्याच्या ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यावेळी शिक्षक नेते संभाजी जाधव, शिक्षक बँक संचालक नंदकुमार वाईंगडे, माजी उपसभापती विठ्ठल कदम, सूर्यकांत चौगुले, संजीव गोणी व पांडुरंग कापसे यांच्या हस्ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ. वैशाली भोईटे, सतीश तेली, अंतर्गत तपासणीस बाळासाहेब वालीकर, सुंदर व उत्कृष्ट अहवाल सजावट करणारे विजय पाटील व सचिन गवळी आणि सेवानिवृत्त सभासद शशिकांत गोडसे व सौ. शालन कालकुंदरीकर यांचा सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक करताना सभापती उत्तम यमगेकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेने केलेली उपविधी दुरुस्ती व सभासदाभिमुख कल्याणकारी योजनांची माहिती देत पुढच्या आठवड्या पासून सभासदांना सर्व व्यवहार अँपद्वारे करता येणार असून ॲपचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती दिली.
संस्थेचे सचिव दिपक शिवुडकर यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले तर, सभासदांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना सभापती उत्तम यमगेकर, माजी सभापती राजकुमार शिंगटे , संचालक विजय शिंदे, आनंदा आजगेकर, अयाज बागवान, सचिव दिपक शिवुडकर यांनी अभ्यासपूर्ण व समाधानकारक व समर्पक उत्तरे दिली. सभेपुढील सर्व विषय बहुमताने व चर्चेद्वारे सर्वानुमते मंजूर करण्यात आले. संचालक मंडळाने केलेला पारदर्शी कारभार, संस्थेने मिळवलेला विक्रमी नफा व सर्व प्रश्नाची समाधानकारक उत्तरे दिल्याबद्दल सभापती व संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सभेमध्ये चर्चेत संदिप कदम,राजेंद्र चौगुले,राजेंद्र मांडेकर,चंद्रकांत मुन्नोळी,विजय कुंभार,श्रीकांत पाटील, भरत शेळके, मधुकर जांभळे,तानाजी पुंडपळ,केम्पांना कोरी यांनी सहभाग घेतला. स्वागत व सुत्रसंचालन संचालक अयाज बागवान यांनी तर आभार उपसभापती रवींद्र पाटील यांनी मानले.
सभेला शिक्षक नेते डी.एस.खामकर, शिक्षक संघ अध्यक्ष अनिल बागडी, महिला आघाडी अध्यक्षा अर्चना निळकंठ, सरचिटणीस मालन माळी, जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष आनंद पाटील, उर्दू संघटनेचे आरिफ चौगुले, शिक्षणमंच सचिव विक्रम गडकर, कार्याध्यक्ष शरद देसाई, उपाध्यक्ष संदीप बाबर,आर.एन. पाटील,दिलीप शिंगटे,प्रसिद्धी प्रमुख सुनील कांबळे, प्रेमलता कदम,अलका कडाकणे संगीता काळगे, दीप्ती पाटील,मालन पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभा यशस्वी होण्यासाठी सुधीर उर्फ आप्पा शिवणे, सागर कुंभार, स्वप्नील साळोखे, उमा सुतार, विजय केसरकर या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





