गडहिंग्लजला माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था व दादा प्रेमी ग्रुपच्या वतीने पुरस्कार प्राप्त गुणी शिक्षकांचा सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच शाळा व शिक्षकांचे अस्तित्व जपणारे अमोघ अस्त्र आहे. शिक्षक हा समाजाचा आत्मा असून आपल्या कर्तुत्वावरच भावी पिढीचे भवितव्य घडवीत असतो. शाळेच्या प्रगतीसाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि समाज विश्वास जपण्यासाठी अथक परिश्रम घेतल्यास समाजाचा सन्मान मिळेल आणि भविष्य सुरक्षित होईल असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था शाखा गडहिंग्लज व दादा प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कार प्राप्त गुणी शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वागत संपत सावंत यांनी तर संजय देसाई यांनी प्रास्ताविक केले.यावेळी बोलताना दादासाहेब लाड म्हणाले, विद्यार्थ्यांचे गुणोत्तर व निकाल हे शाळेच्या अस्तित्वाचे प्रमुख मापदंड झाले पाहिजेत. शाळा टिकवणे म्हणजे फक्त इमारत टिकवने नव्हे; तर ती गुणवत्ता, संस्कार व नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारी असली पाहिजे. शिक्षक एक दिलाने कार्यरत राहिले तर कोणतेही संकट मोठे नसल्याचे सांगितले. तहसीलदार ऋषिकेत शेळके म्हणाले, शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानाचे भांडार नसून ते एक संस्काराचे केंद्र असते. तो एक विचारांचा दीपस्तंभ असून समाजाचे भविष्य घडविणारा खरा शिल्पकार असल्याचे सांगितले. माध्यमिक पतसंस्थेचे चेअरमन के. बी. पाटील, कोजिमाशिचे चेअरमन सचिन शिंदे, मुख्याध्यापक संघाचे सेवानिवृत्त सदस्य रफिक पटेल, महाराष्ट्र शासनाचा डॉ. रंगनाथन ग्रंथ मित्र पुरस्काराने सन्मानित दत्ता देशपांडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मान्यवरांच्या शुभहस्ते नूतन मुख्याध्यापक व पुरस्कार प्राप्त जवळजवळ ४० गुणी शिक्षकांचा सन्मान झाला. यावेळी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक आर. के शिंदे, जे. डी. पाटील, कोजिमाशिचे संचालक मदन निकम, दीपक पाटील, मनोहर पाटील, संजय भांदुगरे,सौ. ज्योत्स्ना पताडे, सौ. शुभांगी कुंभार, विनायक नाईक, राजाराम माने, रमेश चौगुले, बाळासाहेब परितकर, सौ. कविता कागीनकर, सौ.भाग्यश्री लोहार, टी.बी. देसाई, आर.ए. गायकवाड, उमेश सावंत, अनिल देशमुख, सी.बी. निकम, वैजनाथ पालेकर, राजेंद्र शेलार, प्रा. जयवंत पाटील, दत्ता लोहार, आर. बी. शिंत्रे, विकास पाटील, पवन सूर्यवंशी, ईनास कुटीन्हो उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ चव्हाण,अर्जुन हराडे यांनी केले. आभार अनिल पाटील यांनी मानले.