विसर्जन मिरवणुकीवेळी दरवर्षी उपक्रम ; मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिंदे शिवसेना शाखा हसुरचंपू व शाहू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे गावातील सर्व गणेशोत्सव तरुण मंडळांना मानाचा पान विडा देऊन सर्व अध्यक्ष व सदस्यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व तरुण मंडळांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मारुती कमते, संभाजी येरुडकर, चंद्रशेखर खवणे, आनंदा माने, सुरेश शेंडगे, महादेव मस्ती, बिराप्पा हुक्केरी, भीमा औरगोळे, सुरेश मसुरे, राजू बिरांजे, रावसाहेब औरगोळे, बिपिन कांबळे ,मंजुनाथ लोहार, ग्रामपंचायत सदस्य सचिन शेंडगे, भीमा दूडगे, अजित कांबळे, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.