गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अंकुर ब्लड सेंटर निपाणी, स्मार्ट क्लीनिकल लॅबोरेटरी, श्रीशा क्लीनिक, तेरणी यांचे सहकार्य
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील तेरणीचा विघ्नहर्ता कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात २३ बॅगा रक्त संकलन करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. व्हसकोटी म्हणाले, पदार्पणातच तेरणीचा विघ्नहर्ता या मंडळाने राबविलेले समाज उपयोगी उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. या मंडळाचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे. मंडळाच्या या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बसवंत फडके यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले.
कार्यक्रमास उपसरपंच सौ. अंजना निंबाळकर, सदस्या सौ. दीपा नरेवाडी, सुनीता सुतार, सौ. सरिता बेळी, शंकर निंबाळकर, केदारी मांगले, बसवंत फडके, माजी सैनिक करवीर मांगले, शिवाजी व्हनोळी, परशुराम पाटील, उत्तम नरेवाडी, रमेश निंबाळकर, पोस्ट मास्तर करवीर नावलगी, राजेसो गंधनवाले, सुजाता अगसगी, गीता निंबाळकर, माजी सैनिक भीमा सासगिरी, उत्तम जाधव, सरदार परीट, अजित पाटील, तेरणीचा विघ्नहर्ता गणेश मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश मांगले, उपाध्यक्ष संतोष कतिगार, खजिनदार संतोष उथळे, सेक्रेटरी निलेश नरेवाडी, सल्लागार डॉ. श्रीधर बेळी, स्मार्ट लॅबोरेटरीचे साकिब गंधनवाले यांच्यासह ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश मांगले यांनी तर सूत्रसंचालन डॉ. श्रीधर बेळी यांनी केले. सदर शिबिरासाठी अंकुर ब्लड सेंटर निपाणी व स्मार्ट क्लीनिकल लॅबोरेटरी, श्रीशा क्लीनिक, तेरणी यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, तत्पूर्वी डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या उपस्थितीत तेरणीचा विघ्नहर्ता मंडळाच्या आरतीचा कार्यक्रम पार पडला.