गडहिंग्लज (प्रतिनिधी): रावसाहेबआण्णा कित्तूरकर ज्युनिअर कॉलेजमध्ये मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस प्राचार्य श्रीरंग तांबे यांनी हार घालून प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत प्रा. दयानंद ग्वाडी यांनी केले. कु. अर्पण शहा, कु. तनवी कायदगी, कु. क्रांती किल्लेदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने भित्तिपत्रिकेचे उदघाटनही यावेळी करण्यात आले.
यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. पुंडलिक रक्ताडे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. इजाज आजरेकर, प्रा. सौरभ पाटील, प्रा. संतोष कांबळे, प्रा. दिपक डावरे, प्रा. सुभाष तिप्पे ,प्रा. तृप्ती हंजी, प्रा. अश्विनी पाटील, प्रा. सोनाली घुगरे यांच्यासह सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन कु.रिया देवरकर यांनी केले तर आभार कु. रिया सावंत यांनी मानले.