Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुगडीकट्टी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ

बुगडीकट्टी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची माहिती देताना मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिनराळे. शेजारी सरपंच दयानंद देसाई, ग्रामपंचायत अधिकारी सुजाता पाटील, ग्राम महसूल अधिकारी मलगोंडा कळसगोंडा व इतर.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): बुगडीकट्टी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच दयानंद देसाई अध्यक्षस्थानी होते. मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिनराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 



यावेळी मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिनराळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्राम महसूल अधिकारी मलगोंडा कळसगोंडा, ग्रामपंचायत अधिकारी सुजाता पाटील, सरपंच दयानंद देसाई, ग्रामपंचायत सदस्य जोतिबा हुबळे, वसंत नाईक, विठ्ठल राजगोळे, रुद्राप्पा देसाई, रामा हुदली यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स व ग्रामस्थ उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.