गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजला ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पैगंबर जयंतीला 1500 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त सुन्नी जुम्मा मशीद येथून भव्य जुलूस अर्थात मिरवणुकीचे आयोजन करण्यात होते. रंगीबेरंगी फुगे आणि मक्का मदीनेची ट्रॅक्टर वर सजवलेली प्रतिकृती हे या जुलूसाचे विशेष आकर्षण होते. जुलूसचा शुभारंभ राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, नागेश चौगुले, राजेंद्र खणगावे, नरेंद्र भद्रापूर, उदय परीट, प्रा. सुनील शिंत्रे, दिलीप माने, नितीन देसाई, पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, संतोष चिकोडे, रियाजभाई शमनजी आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
मिरवणूक सुन्नी जुम्मा मशीद ते महालक्ष्मी मंदिर रोड, नेहरू चौक, शिवाजी चौक, मुल्ला मशीद, हुजरे गल्ली, बाजारपेठ मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलपर्यंत काढण्यात आली. यावेळी सलाम पठण हबीब मकानदार, अमीर अली मुजावर, नदीम बाबा शेख, सलीम खलिफ यांनी म्हटले. सामूहिक प्रार्थना मौलाना मेहमूद रजा यांनी केली.
जुलूसचे व महाप्रसादाचे नियोजन प्रेसिडेंट मंजूर मकानदार, इर्शाद मकानदार, प्रा. अशपाक मकानदार, परवेज शेख, रफीक पटेल, गौस मकानदार, अल्ताफ शानेदिवाण, फिरोज मणेर, सोहेल मकानदार, एम. एस. बोजगर, हैदर जमादार, हुसेन मकानदार व दादा जे एम ग्रुप यांनी केले.






