गावातील विविध समाज बांधवांचाही पाठिंबा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मराठा आरक्षण प्रश्नासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी कळविकट्टे येथे संतोष मायानावर यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान, सकल मराठा समाजासह गावातील ओबीसी, रामोशी, लिंगायत समाजाने श्री. मायनावर यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.
यावेळी मराठा आंदोलक संतोष मायानावर यांनी मंडळ अधिकारी आपासाहेब जिनराळे, ग्राम महसूल अधिकारी मलिकार्जुन कळसगौडा यांच्यासह पोलीस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी पोलीस पाटील गंगाराम पाटील, सरपंच आनंदा पाटील, उपसरपंच किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य पवन कुलकर्णी, वंदना सुतार, प्रवीण बोलके, शंकर पाटील, प्रकाश पाटील, शरद पाटील, आप्पी पाटील, पिराजी हट्टी, परशराम इरगार, सखाराम वंटमुरे, नामदेव गायकवाड, पी. पी. नाईक, मारुती तेरणी, अमोल हुलोजी, पुंडलिक पाटील, हनुमंत पाटील, कल्लाप्पा पाटील, दीपक दंडवते, प्रकाश देसाई, शशिकांत नीलांजनावर, शेट्टुपा देसाई, सचिन देसाई, अरुण सुळेभावीकर, धोंडीबा पाटील, परशुराम मगदूम, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, भास्कर पाटील, धोंडीबा चौगुले, वीरगोंडा देसाई, प्रभाकर चिगरी, पिराजी चिगरी, देवदास काळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.