Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या 'संत गजानन' अभियांत्रिकीचे ११ विद्यार्थी 'टॉप टेन' मध्ये झळकले

शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत दबदबा कायम 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठामार्फत एप्रिल-मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यामध्ये महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयातील तब्बल ११ विद्यार्थी विद्यापीठाच्या ‘टॉप टेन’ गुणवत्ता यादीत झळकत गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे. दरवर्षी मिळणारे यश म्हणजे महाविद्यालयाच्या प्रगतीला आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाला मिळालेली मोठी दाद असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


या यशात इलेक्ट्रॉनिक्स विभागातील अनुराधा पाटील व इलेक्ट्रिक विभागातील जयश्री होळी या विद्यार्थिनीने विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत महाविद्यालयाचा मान उंचावला. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल मधून रिद्धी दोरुगडे (द्वितीय), सानिका सावंत(तृतीय), सानिका शिंगटे(चौथा), निहा राऊत (सातवा), राहुल दरुटे(दहावा), इलेक्ट्रॉनिक्स विभागातून ऋतुजा मोरबाळे (द्वितीय), साक्षी दावणे (आठवा), मेकॅनिकल मधून सत्यम चौगुले (पाचवा), विवेक मोरये (आठवा)क्रमांक पटकावत पहिल्या दहामध्ये आपले स्थान पक्के केले.



यावेळी रजिस्टार प्रा.शिरीष गणाचार्य, प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत, उपप्राचार्य डॉ. सचिन मातले,प्रा. अमरसिंह फराक्टे , प्रा. शिवलिंग स्वामी, डॉ. अमोल माने, प्रा. विनायक घाटगे, प्रा. सचिन गावडे, डॉ. प्रदीप चिंधी,प्रा. महेश भांदिगरे सह सर्व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.