गडहिंग्लजमध्ये पोलीस दलाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणराया अवॉर्डचे वितरण
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक प्रश्नांसंदर्भात गणेशोत्सवात जनजागृती करावी असे आवाहन गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले. गडहिंग्लज विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गणराया अवॉर्ड वितरण सोहळा नुकताच येथील मंत्री सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक श्री. जाधव पुढे म्हणाले, सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवात सामाजिक प्रश्नांसंदर्भातील जनजागृती करावी. त्याचबरोबर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. विशेष करून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे यासंदर्भात जनजागृतीवर भर द्यावा. डीजे-डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्ये वापरावीत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, तहसीलदार ऋषिकेत शेळके, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राम सूर्यवंशी, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे यांचीही भाषणे झाली. यावेळी गतवर्षी एक गाव एक गणपती, पर्यावरणपूक गणेशोत्सव, विधायक उपक्रम राबविलेल्या मंडळांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, चंदगडचे विश्वास पाटील, भुदरगडचे किरण लोंढे, आजऱ्याचे नागेश यमगर, नेसरीचे आबा गाडवे, सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक हणमंत नाईक आदी उपस्थित होते.
गणराया अवॉर्ड मिळालेल्या मंडळांची नावे पुढील प्रमाणे -
गडहिंग्लज तालुका: युनिव्हर्सल फ्रेंडस सर्कल (गडहिंग्लज), सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (नूल), सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (भडगांव), रामलिंग गणेश तरुण मंडळ (हलकर्णी), फ्रेंड ग्रुप (मुत्नाळ)
नेसरी पोलिस ठाणे: जयहिंद कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ (मुंगूरवाडी), जबरदस्त तरुण मंडळ हनुमान चौक (नेसरी), गणेश तरुण मंडळ (बिद्रेवाडी), सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (सांबरे), उमाजी नाईक क्रीडामंडळ (नेसरी),
चंदगड तालुका: संकल्प मित्र मंडळ (लक्कीकट्टे), अष्टविनायक मंडळ (तडशिनहाळ), अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ (अडकूर), श्रीरवळनाथ मंडळ (हलकर्णी), श्री रामदेव मंडळ (चंदगड).
आजरा तालुका: सार्वजनिक गणेश मंडळ (सुळे), मोरया गणेशोत्सव मंडळ (यमेकोंड), सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (आजरा), मुकुंददादा आपटे गणेशोत्सव मंडळ (इंदिरानगर-उत्तूर), विठ्ठल तरुण मंडळ (भादवण)
भुदरगड तालुका- संघर्ष तरुण मंडळ (खानापूर), आदर्श राजा छ. शिवाजी तरुण मंडळ (पळशिवणे), युवा मंच (सालपेवाडी), ओमकार तरुण मंडळ (करडवाडी), लालबाग तरुण मंडळ (दारवाड).