Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा 18 ऑगस्टला निकाल




मुंबई : शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


शासनाच्या दिनांक ०2 मे 2025 च्या पत्रान्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिनांक १६ जुलै २०२५ रोजीच्या प्रसिद्धी निवेदना‌द्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती. या परीक्षेस एकूण २२८८०८ परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परोक्षस एकूण २११३०८ प्रविष्ट झाले होते. त्यापैकी बी.एड. परीक्षेचे १५,७५६ ॲपिअर व डी.एल.एड. परीक्षेचे १,३४२ ॲपिअर  असे एकूण १७,०९८ विद्यार्थी/उमेदवारांनी ॲपिअर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. तरी दि. १४ ऑगस्ट २०२५ अखेर बी.एड. परीक्षेचे ९,९५२ व डी.एल.एड. परीक्षेचे ८२७ असे एकूण १०,७७९ ॲपिअर  विद्यार्थी / उमेद‌वारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. अशा विद्यार्थ्यांचा /उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.


तथापि ज्या विद्यार्थी/ उमेद‌वारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयास अ‌द्यापपर्यंत सादर केलेले नाही, अशा उर्वरित बी.एड. परीक्षेचे ५,८०४ व डी.एल.एड. परीक्षेचे ५१५ अशा एकूण ६,३१९ ॲपिअर वि‌द्यार्थ्यांचा उमेदवारांचा  निकाल राखीव ठेवण्यात येईल.


तरी वि‌द्यार्थ्यांनी/ उमेदवारांनी अ‌द्यापपर्यंत https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025 InfoAppear.aspx या लिंकमध्ये विहित मुदतीत माहिती सादर केली नाही, अशा विद्यार्थी/उमेदवारांनी दिलेल्या लिंक‌द्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची राहील. तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी/उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.