स्थानिक कलाकारांनी भाग घेत सादर केली देशभक्तीपर गीते
छायाचित्र: मज्जिद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या 'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तिरंगा संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमन युथ सर्कलचे अध्यक्ष हबीब मकानदार, कला अकादमीचे प्रा. शिवाजीराव पाटील, नगररिषदेकडील सर्व विभागप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. दैनिक 'तरुण भारत संवाद' चे ज्येष्ठ पत्रकार जगदीश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाची सुरवात सौ. गीता पाटील यांनी गायीलेल्या 'वंदेमातरम' या गीताने झाली. कार्यक्रमात मेरा रंग दे बसंती चोला, मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, कर चले हमफिदा, संदेश आते है, मेरी आन तिरंगा है, माँ तुझे सलाम, आय लव्ह माय इंडिया, देश रंगीला रंगीला, मेरे देशप्रेमीयो यासह विविध देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. विजय पन्हाळकर यांनी 'ऑपरेशन सिंदूर' ही कविता सादर केली.
कार्यक्रमात हबीब मकानदार, सलीम खलिफ, युनुस नाईकवाडे, अभिनंदन बारामती, मजीद किल्लेदार, राजेंद्र भुईंबर व गीता पाटील या स्थानिक कलाकारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता 'जिंदगी मौत ना बन जाये' या गीताने झाली.
मान्यवरांचे स्वागत मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी तर आभार विशाल रोटे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयवंत वरपे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन नगरपरिषद गडहिंग्लज, पूज्य साने गुरुजी वाचनालय, कला अकादामी गडहिंग्लज व अमन युथ सर्कल यांनी केले.