Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर



कोल्हापूर :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जून 2025 मध्ये इंग्रजी 30 व 40 श.प्र.मि. विषयाची परीक्षा दिनांक 18 ते 24 जून 2025 या कालावधीत आणि मराठी व हिंदी 30 व 40 श.प्र.मि. विषयाची परीक्षा दिनांक 30 जून ते दि. 4 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. परीक्षेचा निकाल दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंट घेता येईल.


विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधित संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात येतील. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे 100 जीएसएम (GSM) कागदावर करुन विद्यार्थ्यांना वितरीत करावीत. तसेच संबंधित विद्यार्थ्यास सॉप्टकॉपी PDF स्वरुपात देण्यात यावी जेणे करुन विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र कलर प्रिंटद्वारे 100 जीएसएम (GSM) कागदावर छपाई करुन घेता येईल. संस्थांनी संबंधित प्रमाणपत्र गुणपत्रके वितरीत केलेली पोहोच दप्तरी जतन करुन ठेवावी.


निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसात परीक्षार्थींनी गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रुपये 100/- प्रमाणे व छायाप्रती मिळण्यासाठी प्रति विषय रुपये 400/- रक्कम ऑनलाईन पध्दतीने दिनांक 29 ऑगस्ट 2025 पर्यंत भरण्यात यावेत.गुणपडताळणी  व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुर्न-मुल्यांकनासाठी प्रती विषय रु.600/- प्रमाणे ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरुन अर्ज करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, याबाबतच्या सविस्तर सुचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.