कोल्हापूर : भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अग्निवीर भरती 2025 मद्रास इंजिनिअर ग्रुप, बंगलोर यांच्या अंतर्गत आजी माजी सैनिक पाल्य, विधवा पाल्य, आजी माजी सैनिकांचे अवलंबित तसेच खेळाडू यांच्यासाठी दिनांक 6 ऑक्टोबर 2025 पासून ट्रैनिंग बटालियन III, MS नगर गेट, मद्रास इंजिनिअर ग्रुप, बंगलोर या ठिकाणी भरती होणार आहे. जास्तीत जास्त नव युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा ईमेल आय डी zswo_kolhapur@maharashtra.gov.in व दूरध्वनी क्र. 0231-2665712 किंवा व्हॉटसअॅप क्र. 9172035612 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवरुन चौकशी करु शकतात, असेही डॉ. भिमसेन चवदार यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.