गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 151.3 मिमी पावसाची नोंद
कोल्हापूर : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर असून कोल्हापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे तुडुंब भरुन वाहत आहेत. नैसर्गिक आपत्ती विषयी जिल्हा प्रशासनाकडून दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून 19 ऑगस्ट रोजीच्या सकाळी 10 वाजेपर्यंतचा अहवाल पुढील प्रमाणे आहे.
मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 151.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात हातकणंगले- 50.8 मिमी, शिरोळ -34.4 मिमी, पन्हाळा- 70.9 मिमी, शाहुवाडी- 77 मिमी, राधानगरी- 91.8 मिमी, गगनबावडा- 151.3 मिमी, करवीर- 59.9 मिमी, कागल- 72 मिमी, गडहिंग्लज- 51.9 मिमी, भुदरगड- 92.2 मिमी, आजरा- 66.9 मिमी, चंदगड- 65.4 मिमी असा एकूण 65.5 मिमी पाऊस 24 तासात पडल्याची नोंद आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरु आहेत. राज्यमार्ग 4 बंद झाले आहेत. प्रमुख जिल्हा मार्ग 12 बंद, इतर जिल्हा मार्ग 1 आणि ग्रामीण मार्ग 10 असे एकूण 11 रस्ते बंधाऱ्यावर, रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद आहेत. बंद असलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरु आहे.
जिल्ह्यामध्ये 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडलेली तालुकानिहाय सर्कल : हातकणंगले- 1, पन्हाळा- 5, शाहूवाडी- 5, राधानगरी- 6, गगनबावडा- 2, करवीर- 4, कागल - 4, गडहिंग्लज-1, भुदरगड - 5, आजरा- 3, चंदगड- 5 व शिरोळ- 0.
पावसामुळे नुकसान झाल्याचा तपशिल -
पूर्णत: पडलेली घरे- पक्की घरे व कच्ची घरे- 18 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या – 01, 18 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 04
अंशत: पडलेली घरे- पक्की घरे- 18 ऑगस्ट रोजीची संख्या – 00, 18 ऑगस्ट पर्यंतची संख्या- 04. कच्ची घरे- 18 ऑगस्ट रोजीची संख्या - 66, 18 ऑगस्ट पर्यंतची संख्या- 627
पडझड झालेल्या झोपडपट्ट्यांची संख्या- 18 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 00, 18 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 00
बाधित गोठ्यांची संख्या - 18 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 01, 18 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 39
जिवीत हानी/ मृत व्यक्ती- 18 ऑगस्ट रोजीची संख्या - 00, 18 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 03
मृत दुधाळ जनावरे-
मोठी जनावरे- 18 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 01, 18 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 07
सार्वजनिक/ खासगी मालमत्तांचे नुकसान-
सार्वजनिक मालमत्ता- 18 ऑगस्ट रोजीची संख्या - 00, 18 ऑगस्ट 2025 पर्यंतची संख्या- 05
खासगी मालमत्ता-18 ऑगस्ट 2025 रोजीची संख्या - 68, 18 ऑगस्ट पर्यंतची संख्या- 661
आज रोजीची स्थलांतरीत कुटूंब संख्या- निरंक
नैसर्गिक आपत्ती अहवाल दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यामधील नदी पातळी, धरण, वाहतूक व नुकसानाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
नदी पातळी (पंचगंगा नदी): पंचगंगा नदीची पातळी (सकाळी 10 वाजेपर्यंत) खालीलप्रमाणे आहे:
राजाराम बंधारा: सद्याची पातळी 35.11 फूट (इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट).
शिरोळ बंधारा: सद्याची पातळी 43.00 फूट (इशारा पातळी 74 फूट, धोका पातळी 78 फूट).
नृसिंहवाडी: सद्याची पातळी 40.6 फूट (इशारा पातळी 65 फूट, धोका पातळी 68 फूट).
सुर्वे : सद्याची पातळी 32.8 फूट (इशारा पातळी 48 फूट, धोका पातळी 50 फूट).
रुई : सद्याची पातळी 61.08 फूट (इशारा पातळी 67 फूट, धोका पातळी 70 फूट).
इचलकरंजी : सद्याची पातळी 57.02 फूट (इशारा पातळी 68 फूट, धोका पातळी 71 फूट).
तेरवाड: सद्याची पातळी 51 फूट (इशारा पातळी 71 फूट, धोका पातळी 73 फूट).
धरण स्थिती: जिल्ह्यातील प्रमुख धरणांची स्थिती (19 ऑगस्ट ) खालीलप्रमाणे आहे:
राधानगरी धरण: एकूण क्षमता 8.36 टीएमसी, आजचा साठा 8.36 टीएमसी, टक्केवारी 100.00, विसर्ग 11500
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 1,2,3,4,5,6 व 7 (सर्व दरवाजे) खुले आहेत.
तुळशी धरण: एकूण क्षमता 3.47 टीएमसी, आजचा साठा 3.42 टीएमसी, टक्केवारी 99.00, विसर्ग 1500
वारणा धरण: एकूण क्षमता 34.39 टीएमसी, आजचा साठा 32.12 टीएमसी, टक्केवारी 93.00, विसर्ग 18630
दूधगंगा धरण: एकूण क्षमता 25.39 टीएमसी, आजचा साठा 23.49 टीएमसी, टक्केवारी 93.00, विसर्ग 7600
नैसर्गिक दैनंदिन आपत्ती अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिला आहे.