Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीता कांबळे 'लाचलुचपतच्या जाळ्यात'

40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले 


पोलीस ठाण्याच्या आवारातच कारवाई झाल्याने उडाली खळबळ 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे यांना चाळीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. पोलीस ठाण्याच्या आवारातच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नीता कांबळे यांच्या केडीसीसी कॉलनी येथील घराची देखील झडती घेण्यात आली. याप्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.



 याबाबतची अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाणे येथे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ते वाहन सोडविण्यात आले होते. त्याच्या तसेच गुन्ह्यातील कलमे कमी करून गुन्ह्याची कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात साठ हजार रुपयांची लाच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीता कांबळे यांनी मागितले होती. तडजोडी अंती चाळीस हजार रुपये देण्याचे ठरले होते. याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर या तक्रारीची पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. यावेळी नीता कांबळे यांना चाळीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. 



 ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार संदीप काशीद, पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पोवार यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.