Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लाभार्थ्यांना विविध विभागांकडून प्रमाणपत्रे सुपूर्द 


तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिली शासकीय योजनांची माहिती 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे शिबिर पार पडले. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिरात सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपतीशिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून झाली. केंद्र शाळेच्या इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने  मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भडगाव गावच्या तलाठी सौ. रूपाली कांबळे यांनी केले.  तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी  यांचा सत्कार गुलाबाचे रोपटे देऊन करण्यात आला. यावेळी तहसीलदार श्री. शेळके यांनी शासकीय योजनांची माहिती सांगितली. त्यानंतर सर्व विभागांच्या विभागप्रमुखांनी इतर योजनांची माहिती दिली. या शिबिरात  लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.




यावेळी भडगाव गावचे सरपंच सौ.वंदना शेंडूरे,  पोलीसपाटील उदय पुजारी, मंडळअधिकारी राजेंद्र पाटील, अनिकेत कोणकेरी, भडगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, केंद्रशाळा भडगावचे  केंद्रप्रमुख महारुद्र हुक्केरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, केंद्र शाळा भडगावचे शिक्षक, कल्लेश्वर हायस्कूलचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, आशा वर्कर्स, ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार भडगाव गावचे उपसरपंच दिपकराज कोरे यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री भुसूरी यांनी केले. जयश्री मोहिते यांचे सहकार्य लाभले.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.