![]() |
नांगनूर: येथील स्मशानभूमी शेड परिसरात वृक्षारोपण करताना बाळकृष्ण रावण, एस बी पाटील, विनोद मोकाशी आदी. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे लोकसहभागातून स्मशानभूमी शेड परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. व्हाट्सअप मेसेज मधून वृक्षारोपणासाठी रोपे अगर आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा व स्मशानभूमी शेड परिसरात जांभूळ, वड, पिंपळ, आवळा, करंजी, उंबर, चिंच, काजू, चेरी, कडुलिंब अशा गावठी वाणांच्या ६० रोपांची लागवड करण्यात आली. तरुणांनी रोपांच्या संगोपनाची जबाबदारी उचललेली असून रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बाळकृष्ण रावण ,एस बी पाटील, विनोद मोकाशी ,सुनील लोहार, संजय रावण, विक्रांत नार्वेकर, सुधाकर घोरपडे, आप्पा जाधव, आनंदा चौगले, दीपक रावण, आकाश कांबळे, मयूर कांबळे, राजू कांबळे, कमलाकर कांबळे उपस्थित होते.