गडहिंग्लज (प्रतिनिधी): दुंडगे येथील सनी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, सनी वाचनालय व योग विद्या धाम गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने योग वर्गाच्या आयोजन केले होते.
सुरुवातीला योगगुरु शिवगोंडा खापरे, माजी सरपंच दत्तात्रय मगदूम, सनी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष भिमगोंडा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी ग्रंथपाल सचिन ओहरा, मंडळाचे माजी अध्यक्ष उदय तेलवेकर, सतीश संकेश्वरी, श्रीराम सेनेचे अध्यक्ष अक्षय पाटील, कृष्णा शिंदे,दीप इंग्लिशचे मुख्याध्यापक अजित दावणे, मंडळाचे मार्गदर्शक सतीश मदकरी, सोमगोंडा चिनगोंडा, आनंद गुरव, प्रज्ज्वल पाटील या सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी योगगुरू शिवगोंडा खापरे यांनी योगाचे महत्त्व सांगून योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच प्रत्येक आसनाची माहिती सांगून आपल्या शरीरावर होणारे परिणाम याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक दिनकर खवरे यांनी केले, तर आभार ग्रामपंचायत सदस्य प्रशांत देसाई यांनी मानले.