Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साधना प्रशालेत छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील साधना प्रशालेमध्ये न्याय, समता बंधुता ही मूल्ये समाजात रूजवणारे लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.



कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ॲड.दशरथ दळवी उपस्थित होते . संस्था सचिव  जे. बी. बारदेस्कर यांच्या हस्ते पाहुण्यांचे पुष्परोप देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर ॲड.  दळवी, प्रशालेचे प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. विद्यार्थिनी अनन्या  मिश्रकोटी व विद्यार्थी नितेश कांबळे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.  प्रमुख वक्ते ॲड. दळवी यांनी शाहू महाराजांचे जीवन कार्य, जातीभेदाविरुद्ध लढा, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर शाहू महाराजांचे समाजकारणातील योगदान व सध्या राजकीय स्थितीत महाराजांच्या विचारांची गरज विशद केले.



सूत्रसंचालन  जे .के .सोज यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन एस. व्ही. भवारी, एस. बी. हरळीकर यांनी केले. आभार प्राचार्य श्री. कुटिन्हो यांनी मानले. कार्यक्रमास संचालिका सौ. फिलॉन बारदेस्कर , व्होकेशनल विभाग प्रमुख अनिल देशमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.