Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रांत कार्यालयासमोरील फोर व्हीलर पार्किंग इतरत्र हलवा, फुटपाथ विक्रेत्यांनाही न्याय द्या!

गडहिंग्लज पालिकेला ठाकरे शिवसेनेचे निवेदन




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरात प्रांत कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावरील चार चाकी वाहनांचे पार्किंग इतरत्र हलवावे. तसेच फुटपाथवरील विक्रेत्यांना हटविल्याने त्यांच्यावर अन्याय झाला असून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.


या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहरातून संकेश्वर -बांदा हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे रहदारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतुकीचे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यातच येथील प्रांत कार्यालयासमोर चार चाकी वाहनांचे पार्किंग असल्यामुळे वाहतुकीला पुन्हा अडथळा होत आहे. सदर पार्किंग इतरत्र हलविण्यात यावे. तसेच शहरातील फुटपाथवरील विक्रेत्यांना हटविण्यात आल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या फुटपाथ विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.



यावेळी तालुकाप्रमुख दिलीपराव माने, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, युवासेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील, शहरप्रमुख प्रकाश रावळ, विभाग प्रमुख संजय पाटील, दिगंबर पाटील, सागर कुराडे, मनीष हावळ, श्रीशैलाप्पा साखरे, कृष्णात कांबळे,  मारुती जाधव, संभाजी येडूरकर, संकेत रावण, तुकाराम वाघराळकर, शितल दावणे, फेरीवाले संघटनेचे अकबर मुल्ला,अमर रणदिवे, विजय पवार, सनी मुळे, सागर काकडे  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.