Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गवसे-आल्याचिवाडी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी यल्लाप्पा बागडी



आजरा (हसन तकीलदार ) : ग्रुप ग्रामपंचायत गवसे -आल्याचिवाडीचे उपसरपंच अविनाश हेब्बाळकर यांनी ठरल्याप्रमाणे आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. त्यानुसार सरपंच सौ. रेखा रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन यल्लाप्पा बागडी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.



अविनाश हेब्बाळकर हे मागील दोन वर्षापासून उपसरपंच पदावर विराजमान होते, परंतु ठरलेनुसार त्यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा सादर केला. राजीनामा मंजूर झालेनंतर यल्लाप्पा बागडी यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली. बागडी यांचे नाव अविनाश हेब्बाळकर यांनी सुचवले तर सौ. सोनाली महेश पाटील यांनी याला अनुमोदन दिले. यावेळी सरपंच रेखा पाटील, सोनाली पाटील, सुषमा मांडवकर अविनाश हेब्बाळकर, ग्रामसेवक विशाल दूंडगेकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.