Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर स्वतंत्र एकात्मिक प्राधिकरणाची स्थापना करून भरीव आर्थिक निधीची तरतूद करा : चंद्रकांत सावंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन 

         



गडहिंग्लज (प्रतीनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुरंदर,सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, प्रतापगड, पन्हाळ्यासह इतर सर्व गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर  स्वतंत्र एकात्मिक प्राधिकरणाची स्थापना करून भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी ईमेल पत्राद्वारे केली आहे.


 


पत्रात पुढे म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाचे साक्ष असलेले आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील गडकिल्ले अतिशय दुर्लक्षित अवस्थेत असून त्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू आहे. तटबंदी आणि बुरूज ढासळत आहेत. हे गडकिल्ले म्हणजे अखंड हिंदुस्थानची अस्मिता, उच्च ऐतिहासिक वारसा, प्रेरणा आणि अभिमान आहे. गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीने नवी उर्जा आणि ताकत प्राप्त होते. पुढील पिढीला स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास समजणे गरजेचे आहे. ऐतिहासिक पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक विकास दरात सुध्दा भर पडणार आहे. रायगड, प्रतापगड,पन्हाळगडासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश व्हावा म्हणून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नामनिर्देशन केले आहे. हे सर्व किल्ले लवकरच जगाच्या नकाशावर येणार आहेत.


तेंव्हा स्वराज्याची राजधानी "रायगड संवर्धन प्राधिकरणाच्या" धर्तीवर महाराष्ट्रातील पुरंदर,सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, प्रतापगड, पन्हाळ्यासह इतर सर्व गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी एकात्मिक स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करून भरीव आर्थिक निधीची तरतूद करावी अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.