Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजचे माजी सैनिक कुमार पाटील यांची भाजपा समर्थक मंचच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती



गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फौंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक कुमार पाटील यांची किसान मोर्चा भाजपा समर्थक मंचच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाली आहे. सदर निवडीचे पत्र भाजपा समर्थक मंचचे राष्ट्रीय नेते दीपक श्रीवास्तव यांनी दिले आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष सुधीर फडके यांच्या हस्ते श्री. पाटील यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.



या पदाच्या माध्यमातून रासायनिक खतांचा वापर न करता विषमुक्त शेती करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर भर देण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणार असल्याचे माजी सैनिक  कुमार पाटील यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उदय सरदेसाई, कोल्हापूर जिल्हा जिल्हाध्यक्ष अजित आहेर, मिशन ऑरगॅनिक संस्था अध्यक्ष राहुल टोपले यांच्यासह आजरा तालुक्यातील कार्यकारिणी सदस्य, शेतकरी व महिला उपस्थित होत्या.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.