Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यातील 'व्यंकटराव'च्या स्वराज आणि विवेकची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड



आजरा(हसन तकीलदार ): गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेच्या कु.स्वराज प्रवीण निंबाळकर व विवेक धनाजी पाटील (इयत्ता नववी) या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत निवड झाल्यामुळे  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड होवून त्यांचे पाच दिवसांच्या अभ्यास सहली करीता बेंगलोर येथे रवाना झाले. 



या यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ, माजी प्राचार्य आर. जी. कुंभार, प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, वर्ग शिक्षक सौ.ए. डी. पाटील, विषय शिक्षक पी. एस. गुरव, व्ही. ए. चौगुले, श्रीमती एस. के. कुंभार यांची प्रेरणा व प्रोत्साहन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्तेही अभ्यास दौऱ्याच्या प्रयाण दरम्यान कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.