आजरा (हसन तकीलदार ) : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील 73 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांच्या सन 2025ते 2030या कालावधिकारिता आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 1 जुलै रोजी सरपंच आरक्षण सोडत होणार असलेबाबत परिपत्रकातून प्रशासनाने माहिती दिली आहे.
ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील दि. 13/06/2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार व मा. सर्वोच्च न्यायालयाकडील दि. 06/05/2025 रोजीच्या आदेशास अनुसरून तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आदेशान्वये आजरा तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीसाठी मंगळवार दि. 01/07/2025 रोजी सकाळी 11:00वा. नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, आजरा येथे बैठक आयोजित केली आहे. तरी आजरा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच सभापती, उपसभापती आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सोडती कामी तहसील कार्यालय, आजरा येथे उपस्थित राहणे बाबत तहसीलदार आजरा यांनी आवाहन केले आहे.