Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी मंडळ अधिकारी पदी आप्पासाहेब जिनराळे यांची नियुक्ती

मंडळ अधिकारी विजयानंद कामत यांची आजरा येथे बदली 


कोल्हापूर जिल्ह्यातील मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्या




कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सहाय्यक महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले आहेत. त्यानुसार गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील मंडळ अधिकारी विजयानंद कामत यांची बदली सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून आजरा येथे झाली असून त्यांच्या जागी चंदगड येथील मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिनराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 



कोल्हापूर जिल्हा महसूल आस्थापनेवरील सहाय्यक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी मुख्यालयात सहा वर्षापेक्षा जास्त तसेच तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदलांचे आदेश काढण्यात आले आहेत.



यामध्ये चंदगड तहसील कार्यालय येथे कार्यरत मंडल अधिकारी आप्पासाहेब जिनराळे यांची बदली हलकर्णी येथे करण्यात आली आहे. कसबा बीड तहसील करवीरचे प्रवीण माने यांची बदली करंजफेण तहसील शाहूवाडी, शिरोळ तहसील येथील मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांची बदली सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून शिरोळ तहसील येथे, कोवाड येथील मंडळ अधिकारी शरद मगदूम यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पिंपळगाव मंडळ अधिकारी श्रीमती अंजली पाटील-धाडणकर यांची बदली शिरोली दुमाला, करडवाडी तहसील भुदरगड येथील मंडळ अधिकारी राहुल धाडणकर यांची बदली सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून करवीर तहसील येथे करण्यात आली आहे. गवसे मंडळ अधिकारी श्रीमती गीता कुंभार यांची बदली उत्तूर येथे, कागल मंडळ अधिकारी कुलदीपक गवंडी यांना मुदतवाढ दिली आहे. बालिंगे तहसील करवीर येथील मंडळ अधिकारी अनिल काटकर यांची बदली इस्पुर्ली येथे, कसबा वाळवे येथील मंडळ अधिकारी कुलदीप जनवाडे यांची बदली पिंपळगाव तहसील भुदरगड येथे, आवळी बुद्रुक तहसील राधानगरी येथील प्रवीण पाटील यांना मुदतवाढ दिली आहे. नेसरी मंडळ अधिकारी संजय राजगोळे यांना मुदतवाढ, उत्तरचे मंडळ अधिकारी प्रवीण खरात यांची बदली गवसे येथे, मुरगुड येथील मंडळ अधिकारी प्रशांत गुरव यांची बदली सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून तहसिल कागल, मलकापूर मंडळ अधिकारी संदेश कदम यांची बदली सहाय्यक महसूल अधिकारी शाहूवाडी, कसबा तारळे येथील मंडळ अधिकारी संजय गीते यांना मुदतवाढ, इस्पुर्ली येथील मंडळ अधिकारी भारत जाधव यांची बदली कसबा बावडा, कसबा बावडा येथील मंडळ अधिकारी प्रणाम भगले यांची बदली गारगोटी, इचलकरंजी येथील मंडळ अधिकारी महेश शिंदे यांची बदली सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून जिल्हा कार्यालय कोल्हापूर, हलकर्णी येथील मंडळ अधिकारी विजयानंद कामत यांची बदली सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून आजरा, कसबा करवीर येथील मंडळ अधिकारी संतोष पाटील यांची बदली बालिंगा येथे, नागनवाडी येथील मंडळ अधिकारी देविदास तारडे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.