गडहिंग्लज व चंदगड तहसिलदार कार्यालय येथे दि.२२ व २३ रोजी शिबीर
कोल्हापूर : देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापुरच्या अधिपत्यखालील सुपूर्द केलेल्या देवस्थान जमिनी ज्या लागणदार शेतकरी यांचेकडे कसणेसाठी असून, त्या देवस्थान जमिनीची लागण रक्कम जमा करणेसाठी कार्यालयाकडून प्रत्येक तहसिलदार कार्यालय येथे दि.१९ मे ते १० जून अखेर शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. ज्या लागणदार शेतकरी यांना लागण रक्कम जमा करण्याची आहे त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन संबधीत गावच्या तहसिलदार कार्यालयात उपस्थित राहुन लागण रक्कम जमा करावी. लागणदार शेतकरी यांनी यापूर्वी समितीकडे लागण रक्कम जमा केली नसल्यास वर्ष १९९०–९१ ते आज अखेरचे ७/१२ उतारे, ज्या लागणदार शेतकरी यांनी समितीकडे पूर्वी ज्या साला अखेर लागण रक्कम जमा केली असेल, जमा रक्कमेच्या पावतीवरील नमुद असलेल्या सालापासुन पुढील ७/१२ उतारे आणणे आवश्यक आहे. लागणदार शेतकरी अगर मयत असलेस मयत दाखला, वारस दाखला घेऊन येणे. ज्या जमिनीबाबत न्यायालयीन दावा चालु असलेस त्या दाव्या संबंधीची प्रत सोबत आणणे. ज्या लागणदार शेतकरी यांनी गा.का. तलाठी यांचेकडे पूर्वी लागण रक्कम जमा केली असलेस त्या पावतीच्या छायांकित प्रती आणावे.
शिबिरांचे तपशील –
राधानगरी व पन्हाळा तहसिलदार कार्यालय – दि.१९ ते २०/०५/२५
गडहिंग्लज व चंदगड तहसिलदार कार्यालय - दि.२२. ते २३/०५/२५
भुदरगड व आजरा तहसिलदार कार्यालय – दि. २७ ते २८/०५/२५
करवीर तहसिलदार कार्यालय – दि.२९ ते ३०/०५/२५
गगनबावडा तहसिलदार कार्यालय – दि.२ ते ३/०६/२५
हातकणंगले व शाहूवाडी तहसिलदार कार्यालय – दि.३ ते ४/०६/२५
कागल व शिरोळ तहसिलदार कार्यालय – दि.९ ते १०/०६/२५
वरील प्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे घेऊन लागणदार शेतकरी यांनी संबधीत तहसिलदार कार्यालय ठिकाणी त्या त्या तारखेस हजर राहून सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीमार्फत करण्यात आले आहे.