शेतकऱ्यांना मिळणार विविध ऑनलाईन सेवा अल्प दरात
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील अवधूत विकास सेवा संस्थेमार्फत 'सीएससी' सेंटरचे उदघाटन एमसीडीसीचे राज्य समन्वयक धनंजय डोईफोडे, विभागीय समन्वय अरुण काकडे, सहाय्यक निबंधक सागर रानमाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रवळनाथ हाऊसिंग फायनान्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे एम. एल. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सुरेश धनवडे होते.
स्वागत सुरेश पवार यांनी केले. यावेळी मान्यवरांचा शाल, पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय डोईफोडे, अरुण काकडे, एम एल चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी अवंतिका करडी, प्रतिभा माने, सुरज शिडलाळे यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेला उत्पन्नासाठी 'सीएससी' कडून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, लाईट बिल, फुड लायसन, ड्रायव्हिंग लायसन, ऑनलाइन ॲडमिशन, पी एम किसान प्रमाणपत्र, झेरॉक्स आदी कामे शेतकरी सभासदांना अल्प दरात मिळणार आहेत.
यावेळी बाबासाहेब पाटील, सुरेश धनवडे, पुंडलिक आरबोळे, सचिव गुरगोंडा पाटील, प्रकाश माने, अशोक महाडिक, रायगोडा पाटील, बाळू कुंभार, बाळासो हुल्लोळी, सदाशिव कांबळे, विजय महाडिक, विकास मगदूम यांच्यासह सभासद उपस्थित होते. आभार रायगोंडा पाटील यांनी मानले.