निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. चार आठवड्यांच्या आत निवडणुकांसंदर्भातील अधिसूचना काढावे म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे.