गडहिंग्लज (प्रतिनिधी): दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील सनी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी भीमगोंडा रामगोंडा पाटील तर सनी वाचनालयाच्या अध्यक्षपदी दिनकर काशिनाथ खवरे यांची सर्वानुमते निवड करणेत आली. मंडळाचे मावळते अध्यक्ष शिवाजी जाधव व वाचनालयाचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या.
मंडळाचे व वाचनालयाचे इतर नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे - सनी मंडळ : कार्याध्यक्ष संजय दूंडापा देसाई, सहकार्याध्यक्ष सोमनाथ हिरेमठ, उपाध्यक्ष सचिन संकपाळ, अरविंद पाटील, राहुल सावंत, अक्षय हिरेमठ, सचिव कपिल पाटील, सहसचिव डॉ.प्रल्हाद जत्राटे, खजिनदार बसगोंडा पाटील, सह खजिनदार भीमगोंडा मालगोंडा पाटील, व्यवस्थापक आप्पासाहेब खवरे.
सनी वाचनालय- कार्याध्यक्ष प्रशांत देसाई, उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, सचिव उदय तेलवेकर, खजिनदार सतीश संकेश्वरी, लेखनिक सदाशिव खवरे, ग्रंथपाल सचिन ओहरा, सदस्य किरण धनवडे, किरण पाटील, प्रफुल्ल कोरी, सदाशिव घबाडे, मलाप्पा कांबळे, संपर्क प्रमुख अजित दावणे, उदय तेलवेकर.
सनी मंडळाचे हे 26 वे वर्ष असून वाचनालयाचे 18वे वर्ष सुरु आहे. आगामी वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
वृक्षारोपण, आरोग्य शिबीर,शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, वक्तृत्व स्पर्धा तसेच वाचनालयासाठी स्वमालकीची इमारत उभारणे असे विविध संकल्प आगामी वर्षाभरात असल्याचे सांगण्यात आले. स्वागत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उदय तेलवेकर केले. आभार ग्रंथपाल सचिन ओहरा यांनी मानले.
यावेळी सतीश संकेश्वरी, दुष्यन्त पाटील, राजेंद्र नाईक, मारुती कलकुटगी, आणाप्पा कांबळे, अविनाश शिंदे, सतीश नाईक, संदीप सोलापुरे उपस्थित होते.