जम्मू : पाकिस्तानशी लढताना जम्मू काश्मीरमध्ये दोन भारतीय जवानांना वीरमरण आले. मुंबईतील जवान मुरली नाईक व जवान दिनेश शर्मा यांचा समावेश आहे.
सीमेवर पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान आता बिथरला आहे. त्यामुळे सीमेवर त्यांच्याकडून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. दरम्यान, आज पहाटे तीन वाजता या गोळीबारात मुंबई येथील घाटकोपर येथे राहणारे जवान मुरली नाईक यांना वीरमरण आले. मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेश येथील आहेत. तर दुसरे जवान दिनेश शर्मा हे पुंछ सेक्टर येथील गोळीबारात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.