कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता महाडिबीटी पोर्टल वरुन नवीन (fresh) व नुतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्विकृती दि. 15 जून 2025 पासून सुरू करण्यात येणार असून या योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत खालीलप्रमाणे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार नवीन व नुतनीकरणाचे अर्ज महाविद्यालयाकडून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व निकषांनुसार पडताळणी करून मंजूर करण्यात यावेत, तसेच अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता "महाडीबीटी पोर्टल" लवकरात लवकर शिष्यवृत्तीचे अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रीकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलां-मुलींना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) इत्यादी योजना "महाडीबीटी पोर्टल" या प्रणालीव्दारे ऑनलाईनरित्या राबविण्यात येत आहेत.
वेळापत्रक शैक्षणिक स्तर, अर्जाचा प्रकार व प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेषित करण्याकरीता प्रस्तावित मुदत (संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांचे करीता) याप्रमाणे आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम (उदा.इ. 11 वी, 12 वी (सर्व शाखा), इ. 11 वी, 12 वी (MCVC), ITI) इत्यादी. कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम (उदा. इ. 11 वी, 12 वी (सर्वशाखा), इ. 11 वी, 12 वी (MCVC), ITI) इत्यादीसाठी नवीन अर्ज- दि. 15 जून ते दि. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत. नुतनीकरणाचे अर्ज- दि. 15 जून ते दि. 30 ऑगस्ट 2025 पर्यंत
वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम (उदा.इ. प्रथम, व्दितीय व तृतीय (सर्व शाखा कला, वाणिज्य, विज्ञान इ.),- नवीन अर्ज- दि. 15 जून ते दि. 10 सप्टेंबर 2025 पर्यंत व नुतनिकरणाचे अर्ज- दि. 15 जून 2025 ते दि. 10 सप्टेंबर 2025 पर्यंत
वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम (उदा. इ. प्रथम, व्दितीय, तृतीय, अंतिम वर्ष (सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अभ्यासक्रम, फार्मसी व नर्सिंग अभ्यासक्रम इ.)- नवीन अर्ज- दि. 15 जून ते दि. 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत. नुतनीकरणाचे अर्ज- दि. 15 जून ते दि.15 नोव्हेंबर 2025पर्यंत.