शिंदे शिवसेना शाखेच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसूरचंपू येथील शिंदे शिवसेना शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब खिचडे, नारायण शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवभक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रणित शिवउद्योग संघटना प्रमुख मारुती कमते, शाखाप्रमुख चंद्रशेखर खवणे, शकील मुल्ला, बिरापा हुक्केरी, महादेव मस्ती, सुभाष हेबुले, लक्ष्मण कमते, लक्ष्मण गोटुरे, महादेव कुंभार, दत्तात्रय नाईक, आनंदा गोंधळी, सदाशिव नांगनुरे, आप्पासाहेब पुरे, संभाजी येडुरकर, तमन्ना घस्ती, पांडुरंग कांबळे, अशोक वाळकी, बिपिन कांबळे, राजू हसुरे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. चंद्रशेखर खवणे यांनी आभार मानले.