भुदरगड तालुक्यात सर्वाधिक 38.1 मिमी पावसाची नोंद
कोल्हापूर : दिनांक 27 मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात एकूण सरासरी 16.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यात 38.1 मिमी आणि गगनबावडा तालुक्यात 36.2 मिमी झाला आहे, तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 6.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नैसर्गिक आपत्ती दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यामधील नदी पातळी, धरण, वाहतूक व नुकसानाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
राजाराम बंधारा: सद्याची पातळी 19.05 फूट (इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट).
शिरोळ बंधारा: सद्याची पातळी 34.00 फूट (इशारा पातळी 74 फूट, धोका पातळी 78 फूट).
नृसिंहवाडी: सद्याची पातळी 32.08 फूट (इशारा पातळी 65 फूट, धोका पातळी 68 फूट).
धरण स्थिती - राधानगरी धरण: एकूण क्षमता 8.36 टीएमसी, सद्याचा साठा 4.00 टीएमसी (47.84 टक्के) स्वयंचलित दरवाजे बंद आहेत.
तुळशी धरण: एकूण क्षमता 3.47 टीएमसी, सद्याचा साठा 1.83 टीएमसी (52.82 टक्के)
वारणा धरण: एकूण क्षमता 34.39 टीएमसी, सद्याचा साठा 13.75 टीएमसी (39.97 टक्के)
दूधगंगा धरण: एकूण क्षमता 25.39 टीएमसी, सद्याचा साठा 4.84 टीएमसी (19.05 टक्के) 100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 299 बंधाऱ्यांपैकी 13 बंधारे पाण्याखाली आहेत.
वाहतूक स्थिती: रेल्वे वाहतूक: निरंक, राष्ट्रीय महामार्ग: निरंक, राज्यमार्ग: 1 बंद, प्रमुख जिल्हा मार्ग: 3 बंद, इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग: निरंक आहे. एकूण 4 रस्ते बंद आहेत.
स्थलांतर: आज रोजीचे स्थलांतरीत कुटुंबांची संख्या निरंक आहे.
अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान: दिनांक 12 मे 27 मे 2025 पर्यंत या कालावधीत जिल्ह्यातील 12 तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची (घर पडझड, इत्यादी) एकूण अंदाजित रक्कम 21 लाख 89 हजार रुपये आहे.
नागरिकांना अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधता येईल. संपर्क क्रमांक: 0231-2659232, टोल फ्री (1077), ईमेल: rainkolhapur@gmail.com.