Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर डाक विभागामार्फत जिल्ह्यात 1 मे पासून "ज्ञान पोस्ट" सेवा सुरु



कोल्हापूर : भारतीय डाक विभागाने दिनांक 1 मे 2025 पासून देशभरातील निवडक पोस्ट ऑफिसमधून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तकांच्या वितरणाचा खर्च कमी करण्यासाठी ज्ञान पोस्ट ही एक नवीन योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील सर्व वि‌द्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक, लेखक यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक ए. यु. निखारे यांनी केली आहे.


ही सेवा देशाच्या सर्व भागातील वि‌द्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रसार आणि शिक्षण साहित्य उपलब्ध करुन देण्याकरिता असून यासाठी इंडिया पोस्ट विशेष लक्ष केंद्रित करत आहे. ज्ञान पोस्टद्वारे पाठ्यपुस्तके, अभ्यास मार्गदर्शक आणि सांस्कृतिक पुस्तके शक्य तितक्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये पोहोचवता येतील. ज्ञान पोस्ट भारतातील सर्वात मोठ्या पोस्टल नेटवर्क‌द्वारे पुस्तके आणि छापील अभ्यासक्रमाचे साहित्य पाठवण्याचा सुलभ मार्ग प्रदान करुन शिक्षणप्रसार आणि ज्ञान-वृद्धिंगत होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.


"ज्ञान पोस्ट" द्वारे पोस्ट केलेली पुस्तके आणि अभ्यास साहित्य इंडिया पोस्टच्या वेबसाईट ‌द्वारे पाहता येईल आणि किफायतशीर वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी भूमार्गाने केली जाईल. या सेवेचे दर अतिशय वाजवी आहेत. जे जास्तीत जास्त 300 ग्रॅम वजनाच्या पॅकेटसाठी 20 रुपयांपासून सुरु होतात आणि 5 किलोग्रॅम वजनाच्या पॅकेटसाठी (कर समाविष्ट) जास्तीत जास्त 100 रुपयांपासून सुरु होतात.


या अनुषंगाने दिनांक 1 मे 2025 रोजी कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक ए. यु. निखारे यांनी जिल्ह्यातील तीनही प्रधान डाकघरमध्ये (कोल्हापूर प्रधान डाकघर, कोल्हापूर सिटी प्रधान डाकघर, इचलकरंजी प्रधान डाकघर) 'ज्ञान पोस्ट" सेवेची सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.