Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अंजुमन इत्तेहादुल इस्लाम आजराच्या अध्यक्षपदी आलम नाईकवाडे

डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या पदाचा कार्यभार स्वीकारला 





आजरा (प्रतिनिधी): आजरा येथील अंजुमन इत्तेहादुल इस्लाम या संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळ बोर्ड, संभाजीनगर यांच्या आदेशानुसार आजऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष आलम अहमद नाईकवाडे यांची निवड करण्यात आली आहे.



सदर झालेली निवड व उपलब्ध कागदपत्रे विचारात घेऊन डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेजचा कार्यभार गटशिक्षणाधिकारी  बसवराज गुरव यांनी तहसीलदार यांच्या आदेशाने आलम नाईकवाडे यांच्याकडे सोपवला आहे.



अल्पसंख्यांकांसाठी असणाऱ्या या संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील राहू तसेच सर्वांना बरोबर घेऊन पारदर्शक कारभार करणार असे पदभार स्वीकारल्यानंतर नूतन अध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी सांगितले.



याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक सलीम शेख, अश्कर लष्करे, ॲड. जावेद दिडबाग, शरीफ खेडेकर, कलाम तकिलदार, हुसेन दरवाजकर, इम्रान माणगावकर, शौकतअली दरवाजकर, याह्याखान बुड्ढेखान, अमिर खेडेकर,बशीर शिडवणकर, सुलेमान  दरवाजकर इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.