प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांचे आवाहन
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय विभाग प्रमुखांनी आपल्या आस्थापनेवरील दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना दि. 30 जून 2025 पर्यंत नव्याने मुदतवाढ देऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख यांनी त्यांच्या आस्थापनेवरील दि.0 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याबाबतची कार्यवाही करणे आवश्यक आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खालील सूचना, कार्यपध्दती अवलंबविण्यात यावी.
शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरीता निविदा (RFP) प्रक्रीया रचवून 3 संस्था, उत्पादकांची निवड केली आहे. त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे 3 झोनमध्ये विभागणी केली असून प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर करीता M/s Rosemeria Safety Systems Ltd या उत्पादक संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे.
M/s Rosemerta Safety Systems Ltd या उत्पादक संस्थेने झोननिहाय अधिकृत फिटमेट सेंटर्सची (FC) नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर करीता नियुक्त अधिकृत फिटमेंट सेंटर्सची यादी सोबत जोडली आहे.
सर्व शासकीय आस्थापनांनी https://transport.maharashtra.gov.in या संकेतम्थळावर नोंदणी करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईमेंट घेऊन वाहनांवर HSRIP बसविण्याची कार्यवाही करावी.
अधिकृत फिटमेंट सेंटर्सची (FC) कडून वाहनांवर बसविण्यात आलेले HSRP हेच केवळ वैध मानल जाईल आणि वाहन पोर्टलवर अद्ययावत केले जाईल.
कोल्हापूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात वापरात असलेली परंतु, इतर परिवहन कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या शासकीय वाहनांना सुध्दा HSRP बसविणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील एका ठिकाणी किमान 25 किंवा 25 पेक्षा जास्त वाहन संख्या असलेल्या शासकीय कार्यालयांनी HSRP बसविण्यासाठी अर्ज केल्यास, त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंया कार्यालयात संबंधित एजन्सीमार्फत कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क न आकारता HSRP बसविण्यात येणार आहे.
HSRP संचासह बसविण्याचे शुल्क (Fitment Charges) GST वगळून खालीलप्रमाणे आहेत.
दुचाकी आणि ट्रॅक्टर - 450 रुपये, तीनचाकी - 500 रुपये व अ.क्र.1 व 2 मधील वगळून इतर सर्व वाहने 745 रुपये इतके आहे.
वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याबाबत काही अडचणी, शंका असल्यास खालील ईमेल आयडी व क्रमांकावर संपर्क साधावा.
HSRP Booking Portal Link, Email and Contact Number-
https://mhhsrp.com
Email: customer.support@mhhsrp.com
Customer Care: 7836888822
0000

